SSC Marathi / Semi-English

SSC Marathi / Semi-English

पुणे केम्ब्रिज पब्लिक स्कूल धनकवडी शाळेची आंतरराष्ट्रीय स्कूल म्हणून निवड

महाराष्ट्र शासनाने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या १०० शाळा निर्मितीचे उद्दिष्ट हाती घेतले आहे. त्यातील सध्याच्या डिजिटल जमान्यात आणि सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये निर्माण होत चालेल्या स्पर्धा बघून शासनाने आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरंदर टेकनिकल एज्यूकेशन सोसायटीच्या, पुणे केम्ब्रिज पब्लिक स्कूल, धनकवडी या शाळेची निवड केलेली आहे.

महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळांतर्गत शैक्षणिक वर्ष २०१९ - २० या वर्षांपासून अस्थायी सलंग्नता प्राप्त करण्याच्या प्रक्रियेत शाळांचे ऑनलाईन अर्ज मागवले होते. त्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या पथका कडून शाळेची तपासणी करण्यात येऊन पुणे केम्ब्रिज पब्लिक स्कूल शाळेस शैक्षणिक वर्ष २०१९ - २० पासून अस्थायी सलंग्नता देण्यात आली आहे. त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०१९ - २० पासून पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग सुरु होणार आहेत. विविध उपक्रमांनी नटलेली E - Learning शाळा म्हणून तसेच दप्तराचे कमी ओझे असणारी विविध सांस्कृतिक कार्यक्रमात पुण्यात अव्वल असणारी प्रगतशील शाळा म्हणून या शाळेस आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून निवडीचे पत्र महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने कळविले आहे.

या शाळा निवडीमागे शाळेने राबविलेले विविध उपक्रम कारणीभूत ठरले आहेत. त्यामध्ये दप्तराविना शाळा, दहावीचे जादा तास, ज्ञानरचनावादी शैक्षणिक पद्धती, क्षेत्र भेटी, ई - लर्निंग, डिजिटल स्कूल, प्रोजेक्टरवर अध्यापन पद्धती, शैक्षणिक साधनांचा वापर, सुसंस्कारांचा परिपाठ, पालकांसाठी स्नेह मेळावा व स्पर्धा, मुलांना स्वसंरक्षण प्रशिक्षण, स्वतंत्र प्रयोगशाळा, संगणकाची व्यवस्था, पुण्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमात सलग तीन वर्ष प्रथम क्रमांक, मोफत पाठ्यपुस्तके, चावडी वाचन, परिपाठामध्ये रोज नावीन्य उपक्रम, निसर्ग सहली, ग्रंथालय व वृत्तपत्रांचे वाचन कट्टा, मुलांकडून कविता लेखन आठवड्याला आनंदमयी परीक्षा, मूल्यशिक्षणाचे पूर्ण परीक्षण, अप्रगत मुलांसाठी खास लक्ष असे अनेक उपक्रम व व्यावसायिक शिक्षण देणारी पुण्यातील एकमेव शाळा म्हणून या शाळेची आंतरराष्ट्रीय पातळीवर शाळा म्हणून निवड झाली आहे.

या कार्यात आंतरराष्ट्रीय बनविण्यासाठी शाळेचे मानद सचिव श्री. चंद्रकांत कुंजीर, सचिव श्री. मयूर कुंजीर तसेच शाळा समिती अध्यक्ष सचिन कोळी व शाळेच्या प्राचार्य सौ. छाया कुंजीर व उपमुख्याध्यापक श्री. धुमाळ सर व सर्व शालेय समिती अध्यक्ष, सर्व सदस्य, सहकारी वर्ग, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांच्या सहकार्याने हे सर्व उपक्रम यशस्वी होत आहेत.